मनपाचे करोना चाचणी स्राव संकलन केंद्र पुन्हा सुरु

मनपाचे करोना चाचणी स्राव संकलन केंद्र पुन्हा सुरु

नगर : अहमदनगर महानगरपालिकेच्यावतीने हिंद सेवा मंडळाच्या रामकरण सारडा विद्यार्थी वस्तीगृह येथे कोरोना चाचण्यांचे स्त्रव केंद्र सुरु होते. आज अचानक स्त्रव केंद्र बंद पडल्यामुळे येथे आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. तसेच त्यांना तात्कळत अनेक तास उभे रहावे लागले. कोरोना संसर्ग विषाणूमुळे नगर शहरातील जनता भयभीत झाली असून, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, त्यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच बंद पडलेेले स्त्राव केंद्र तत्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी  आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे   विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केली.
हिंद सेवा मंडळाच्या रामकरण सारडा विद्यार्थी वस्तीगृह येथे सुरु असलेेले कोरोना चाचणीचे स्त्रव केंद्र अचानकपणे बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण झाली. यावेळी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी तत्काळ केंद्रास भेट देऊन सुरु करण्याचे आदेश दिले.  यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे उपस्थित होते.
यावेळी संपत बारस्कर म्हणाले की, स्त्रावाचे नमुने जिल्हा रुग्णालयाकडे पाठवून आपले कामकाज सुरु ठेवावे. शहरातील नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी व नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी. जिल्हा रुग्णालयाची स्त्रव तपासणी करण्याची 1000 क्षमता आहे, त्यामुळे नागरिकांची अडचण होणार नाही, असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post