मंत्री शंकरराव गडाख यांनी बांधले 'शिवबंधन'

मंत्री शंकरराव गडाख यांनी बांधले  'शिवबंधन'


नगर - शिवसेनेचे सहयोगी सदस्य असलेले जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. त्यांनी स्वतः फेसबुक पेजवर या प्रवेशाची माहिती दिली.

आज शिवसेना पक्ष प्रमुख, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी  शिवबंधन बांधून शिवसेना पक्ष प्रवेश केला यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी,गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे व सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रति असलेल्या निष्ठा व विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करून यापुढे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतूत्वाखाली माझ्या शेतकरी बांधव व गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहीलt

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post