महसूलमंत्री थोरातांकडून राठोड कुटुंबियांचे सांत्वन

महसूलमंत्री थोरातांकडून राठोड कुटुंबियांचे सांत्वन

नगर - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे नगर शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेना उपनेते स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या शिवालय या कार्यालयास भेट दिली.

यावेळी त्यांनी दिवंगत अनिल राठोड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी स्वर्गीय राठोड यांच्या कुटुंबीयांची संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक यांचे देखील सांत्वन केले.

यावेळी नामदार थोरात यांनी अनिल राठोड यांच्या जाण्यामुळे एक चांगला मित्र आपण गमावला अशी भावना व्यक्त केली.

यावेळी नामदार थोरात यांच्या समवेत आमदार डॉक्टर सुधीर तांबे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जयंत वाघ, किरण काळे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गिरीश जाधव, माजी नगरसेवक अशोक दहिफळे, आनंद लहामगे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post