साधा माणूस.. बंद ढाब्यावर बसून घरच्या डब्याचा आस्वाद

साधा माणूस.. बंद ढाब्यावर बसून घरच्या डब्याचा आस्वाद 
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा साधेपणा


नगर : सर्वसामान्यांप्रमाणे वागणेबोलणे, सहज कुठेही मिळुन मिसळून जाणे यासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ओळखले जातात.  मंत्रीपदी असले तरी त्याचा बडेजाव न करता ते आपले काम करीत असतात.  आज उस्मानाबाद येथील स्वातंत्र्य दिन सोहळा आटोपून अहमदनगरला परतताना दुपारी भूक लागली व गडाखांनी आपला ताफा एका बंद ढाब्यावर थांबवला. साध्या ढाब्यावर बाहेर असलेल्या बाजेवर बैठक मारून त्यांनी उस्मानाबादकरांनी दिलेला घरचा डबा उघडून जेवण केलं.  त्यांच्या या साधेपणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गडाख हे कॅबिनेट मंत्री जरी असले तरी त्यांनी त्यांच्यातील साधेपणा उपस्थितांना भावला. जेवताना त्यांनी उपस्थित लोकांशी काही विषयांवर चर्चा देखील केली.
ॲड.सतीश पालवे यांनी सोशल मिडियात पोस्ट लिहून मंत्री गडाख यांच्या या साधेपणाचा आखो देखा हाल अतिशय सुंदर शब्दांत व्यक्त करून उस्मानाबादकरही पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या साधेपणाच्या प्रेमात पडले असल्याचे नमूद केले. 

शंकरराव गडाख यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post