शिक्षक हक्क कायद्यातंर्गत 25 टक्के कोटयातील मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

शिक्षक हक्क कायद्यातंर्गत 25 टक्के  कोटयातील मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरुनगर - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम (12) नुसार
खानगी विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित  व दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. शैक्षणिक वर्ष सन 2020-21 या वर्षासाठी  आर.टी.ई.
अंतर्गत 25% प्रवेशाबाबतत ऑनलाईन अर्ज मागवून सोडत  काढण्यात आली आहे. यात अहमदनगर
जिल्ह्यामध्ये 3382 मुलांची निवड झाली आहे. तसेच प्रतिक्षा यादी जाहिर केली आहे. सर्व विद्यार्थ्यांना
लघुसंदेश पाठविण्यात आलेले आहेत.
शैक्षणिक वर्ष सन 2020-21 हे दिनांक 15/06/2020 पासून सुरु झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील
3382 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी शाळा स्तरावर 1966 विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात आला
आहे. तसेच तालुकास्तराबर 1902  प्रवेश निश्चित झाले आहे. एकूण 1454 विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याचे
बाकी आहे. 25% प्रवेश प्रक्रियेसाठी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून प्रवेशापात्र
विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी पालकांनी कारोना महामारीच्या समस्यामुळे सामाजिक अंतराचे पालन करावे व
योग्य ती काळजी घेवून प्रवेश निश्चित करावेत. दि 31/08/2020 पर्वत सदर प्रवेश पूर्ण करावेत. दि.
31 ऑगस्ट  नंतर वेटिंग लिस्ट मधील विद्यार्थ्यांना  प्रवेश प्रक्रियेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
सद्य परिस्थितीत  पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे जावून कागदपत्रांची   पडताळणी करणे अडचनीचे
आहे. त्यामुळे फक्त  चालू वर्षासाठी शाळास्तरावर  प्राथमिक पडताळणी करुन व संकलन करुन
पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात यावा, असे जि.प.प्राथमिक शिक्षण विभागाने कळवले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post