रोटरी क्लबतर्फे कोविड सेंटरला मदतीचा हात


रोटरी क्लबतर्फे कोविड सेंटरला मदतीचा हात

कर्जत (आशिष बोरा ):-सध्या कोरोना महामारीच्या आजाराने भयभीत झालेल्या रुग्णांना व त्यांच्या साठी काम करनार्या योद्धा मंडळींना धीर देण्याच, सहकार्य करण्याच काम रोटरी क्लब करत आहे.
एखादा व्यक्ती ज्यावेळी पॉझिटीव्ह म्हणून सापडतो त्यावेळी ती व्यक्ती व त्याचे सर्व कुटुंब भयभीत झालेले असते. त्यावेळी त्याला गरज असते ती आधारची व थोड्या सहकार्याची. अशाच पॉझिटीव्ह लोकांना भेटून सेंटर मध्ये काय काय अडचणी आहेत हे विचारुन त्यातीलच एक अडचण म्हणजे कोव्हिड सेंटर मध्ये मोबाईल चार्जींगची कुठलीही व्यवस्था नसल्याने तिथे चार्जींग पॉईंटचे कीट बनवून देण्याच काम रोटरी क्लब ने केले.
कोव्हिड सेंटर मध्ये आलेल्या माणसाचा तिथला मित्र म्हणजे मोबाईलच असतो. मोबाईलच्या माध्यमातून तो आपल्या घरच्यांशी, नातेवाईकांशी, मित्रांशी तो बोलू शकतो, टेंशन कमी करु शकतो,ही गरज ओळखून रोटरीने हे कीट कोव्हिड सेंटर देऊ केले. मागील पंधरा दिवसापुर्वीही 100 पी पी ई व मास्क देऊन सहकार्य केले होते. तहसीलदार यांनी रोटरी क्लबचे आभार मानले व अशा संघटनांनी पुढे येऊन सहकार्य केले तर शासनास व पॉझिटीव्ह पेशंटला नक्कीच सहकार्य होईल व बरे होण्यास नक्कीच मदत होईल, असे सांगितले. .यावेळी रोटरी अध्यक्ष विशाल मेहेत्रे, सचिव घनश्याम नाळे, पत्रकार गणेश जेवरे, अभय बोरा, क्लबचे ट्रेनर नितीन देशमुख,नगर पंचायतीचे जाधव साहेब, कोव्हिड सेंटरचे विश्वास तनपुरे उपस्थीत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post