नगर जिल्ह्यात बहुतांश रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक

नगर जिल्ह्यात बहुतांश रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक 
निधीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा करणार : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात 

नगर : नगर जिल्ह्यातील रस्त्यांच्या प्रश्नांचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला.  नगर शहरातील  उड्डाणपूल, जिल्ह्यातील प्रस्तावित महामार्ग, डागडुजीची आवश्यकता असलेले रस्ते आदी कामांचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आढावा घेण्यात आला. 

जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांच्या नूतनिकरणाची आवश्यकता आहे. काही रस्त्यांच्या बाबतीत केंद्र सरकारचे सहकार्य लागणार आहे. अडचणी सोडवून कामाला गती देण्याच्या सूचना ना.थोरात यांनी  केल्या.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा करून निधीच्या बाबतीतील अडचणी, तसेच कामांची मंजुरी, भूसंपादन आदी विषय सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
---------------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post