आज वाढले ६०९ नवे रुग्ण

*दिनांक: १५ ऑगस्ट, रात्री  ०८ वा.*

*बरे झालेल्या रुग्णांची संख्या साडेनऊ हजाराहून अधिक*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३.८६ टक्के*
*आज  ५१२ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज तर वाढले ६०९ नवे रुग्ण*अहमदनगर: जिल्ह्यात  आज एकूण ५१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ९५०५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७३.८६ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६०९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२११ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २४२, अँटीजेन चाचणीत २०७ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १६० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२३,  संगमनेर १, पाथर्डी १, नगर ग्रा. ४, श्रीरामपूर ६, कॅन्टोन्मेंट ०४, अकोले १, शेवगाव १, मिलीटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २०७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर ३१, राहाता १४, पाथर्डी १३, श्रीरामपुर १७, नेवासा २१, श्रीगोंदा ०९, पारनेर ११, अकोले १५ राहुरी ०७, शेवगाव १७,  कोपरगाव १८, जामखेड १३ आणि कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १६० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ८९, संगमनेर १२, राहाता ०४, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण २६, श्रीरामपुर ०४, नेवासा ०२, श्रीगोंदा ०१, पारनेर ०४, अकोले ०३, राहुरी ०२ कोपरगाव ०१, जामखेड ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 दरम्यान, आज एकूण ५१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा १९३, संगमनेर १८, राहाता १६, पाथर्डी ६१, नगर ग्रा. २५, श्रीरामपूर ३१, कॅन्टोन्मेंट २१, नेवासा ९, श्रीगोंदा २१, पारनेर १४, अकोले १९, राहुरी १७, शेवगाव ६, कोपरगाव २०, जामखेड ५, कर्जत ३६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 *बरे झालेली रुग्ण संख्या: ९५०५*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: ३२११*

*मृत्यू : १५३*

*एकूण रूग्ण संख्या:१२८६९*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

*STAY HOME STAY SAFE*

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*

*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post