लस कमीत कमी वेळेत लोकांपर्यंत पोहचवण्याचे नियोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासीयांना विश्वास
नवी दिल्ली: देशात करोना प्रतिबंधासाठी तीन लसींच्या विविध पातळीवर चाचण्या सुरु आहेत. संशोधक यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. चाचण्या यशस्वी होऊन हिरवा कंदील मिळताच लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु होईल. देशातील जनतेला लस देण्यासाठीचा रोडमॅप तयार होत असल्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी करोना स्थितीचा आढावा घेतला. करोनाच्या सुरुवातीच्या काळात देशात एकच तपासणी लॅब होती. आज देशात 1400 लॅब असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. लस निर्मितीनंतर ती कमीत कमी वेळेत लोकांना देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Post a Comment