पिक विमा योजनेचे खरीप हंगामाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

पंतप्रधान पिक विमा योजनेचे खरीप हंगामाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

खासदार डॉक्टर सुजय विखे  व माजी आमदार कर्डिले यांच्या पाठपुराव्याला यश

केंद्रीय कृषिमंत्री यांच्या थेट हस्तक्षेपानंतर दोन दिवसात पैसे झाले जमा 


नगर - पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 2019 20 या हंगामाचा खरीप पिकांच्या पिक विमा तांत्रिक कारणांमुळे रखडलेला होता . सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर प्रलंबित असलेला या पिक विमा योजनेची रक्कम शेतकऱ्यांना मिळाल्यास पुढील हंगामाच्या
कृषी निविष्ठांसाठी तरतूद करता येईल. अहमदनगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या व्यथा थेट केंद्रीय कृषी  कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची मागील आठवड्यात नवी दिल्ली येथे भेट घेऊन त्यांच्या त्यांच्यासमोर   खासदार डॉक्टर सुजय विखे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व माजी आमदार  कर्डिले यांनी  भेटून मांडल्या आणि यासंबंधीचे निवेदन  दिले . त्यावेळेस कृषिमंत्र्यांनी संबंधित पिक  विमा कंपनीला तातडीने सूचना दिल्या. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर  अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात  साडेबारा हजार रुपये पर्यंतचे अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेचे योजना च्या अंतर्गत       2019 - 20 वर्षातील खरीप हंगामातील कपाशी आणि तूर या पिकासाठी पैसे जमा झाल्याने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांचे शेतकर्‍यांच्या वतीने आभार व्यक्त केले.

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड १५लाख२५ हजार, कर्जत ९ कोटी ७९ हजार, शेवगाव १० कोटी ७४ लाख ६८ हजार, पाथर्डी १ कोटी ५१ लाख ३५ हजार, श्रीगोंदा ३ लाख ५६ हजार, पारनेर ६० हजार, राहुरी ३ कोटी८३ लाख ३० हजार रुपये संबंधित  तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात  खरीप हंगामातील कपाशी आणि तूर या पिकासाठी पैसे जमा करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post