काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी माजिद पठाण तर शहराध्यक्षपदी जोहीन सय्यद

काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी माजिद पठाण तर शहराध्यक्षपदी जोहीन सय्यद

कर्जत (आशिष बोरा ):-
काँग्रेसच्या कर्जत तालुका अल्पसंख्यांक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी माजिद पठाण तर शहर अध्यक्षपदी जोहीन सय्यद यांची निवड करण्यात यात आली असल्याचे पत्र अल्पसंख्यांक जिल्हा आघाडीचे अध्यक्ष अनिस शेख यांनी दिले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे हस्ते नगर येथे हे पत्र देण्यात आले. काँग्रेसच्या ध्येयधोरणांना अल्पसंख्याक समाजासह सर्वांपर्यत पोहचविण्यासाठी आपण काम कराल अशी अपेक्षा यावेळी करण्यात आली. या दोघांचे ही  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, ज्ञानदेव वाफारे, युवक काँग्रेसचे जिल्हा समन्वयक किरण काळे, प्रवीण दादा घुले, ऍड कैलाश शेवाळे, तालुकाध्यक्ष किरण पाटील, युवक काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष सचिन घुले, तात्यासाहेब ढेरे, यांनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post