धोनीची दुसरी इनिंग लोकसभेत...निवडणूक लढवण्याचे निमंत्रण

धोनीची दुसरी इनिंग लोकसभेत...निवडणूक लढवण्याचे निमंत्रण

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.  आता धोनी निवृत्तीनंतर काय करणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

या सर्व चर्चांदरम्यान भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला 2024 ची लोकसभा निवडणूक लढण्याचा सल्ला दिला आहे.

त्यात सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत म्हटलं की, "एमएस धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, इतर कोणत्या गोष्टीतून नाही. संकटांशी लढण्याचा त्याचा स्वभाव आहे. एका टीमचं नेतृत्व करण्याची क्षमता धोनीने क्रिकेटमध्ये दाखवली आहे, त्याची सार्वजनिक जीवनात गरज आहे. त्यामुळे धोनीने 2024 ची निवडणूक लढली पाहिजे."

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post