'मारुतीराव मिसळवाले' यांच्या झणझणीत मिसळला मंत्री वर्षा गायकवाड यांची दाद

मारुतीराव मिसळवाले यांच्या झणझणीत मिसळला मंत्री वर्षा गायकवाड यांची दाद
सुपा येथे ताफा थांबवून घेतला नगरी चवीच्या मिसळचा आस्वाद


नगर : अस्सल चवीमुळे खवय्या नगरकरांच्या जीभेवर अनेक वर्षांपासून अक्षरशः अधिराज्य गाजवणार्या प्रसिद्ध मारुतीराव मिसळवाले यांच्या मिसळीचा दरवळ थेट मुंबई पर्यंत पोहचला आहे.  अनेक मान्यवरही या मिसळचे चाहते असून आज मारुतीराव मिसळवाले यांच्या सुपा येथिल केंद्रात राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी भेट देऊन झणझणीत मिसळचा आस्वाद घेतला. पुणे-नगर महामार्गावर  सुपा मार्गे जात असताना मंत्री गायकवाड यांनी आपला ताफा मारुतीराव मिसळवाले यांच्याकडे थांबवला. त्यांच्यासह
 त्यांचे पती उद्योजक  राजेश गोडसे ऊर्फ राजूभाई यांनीही मिसळचा आस्वाद घेतला.  दोघांनीही मिसळचे कौतुक करीत मारुतीराव मिसळवालेचे संचालक राहुल खामकर, अमित खामकर या बंधुशी संवाद साधला. मारुतीरावांच्या मिसळीची खासियत जाणून घेत त्यांनी झणझणीत चवीला दाद दिली. या मिसळचे मुंबईतही सेंटर असल्याचे ऐकून त्यांनी विशेष कौतुक केले, तसेच हिंगोली येथेही फ्रँचाईसी सुरु करण्याचा सल्ला दिला.
यावेळी राहुल खामकर यांनी मंत्री गायकवाड यांचा सत्कार केला. मिसळचा स्वाद कायम लक्षात राहिल असे सांगत मंत्री गायकवाड यांनी निरोप घेतला.
मारुतीराव मिसळवाले यांची मुख्य शाखा नगरमधील जीपीओ जवळ असून टिव्ही सेंटर, सुपा येथेही फ्रँचाईसी आहेत.

*संकलन- सचिन कलमदाणे* 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post