30 सेकंदात परिसर होणार कोरोना मुक्त: इंजि.डी.आर.शेंडगे
अतुल्य मायक्रोवेव्हचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते लोकार्पण
आता कुठलाही परिसर, पृष्ठभाग, वस्तू, घरातील, ऑफिस मधील फर्निचर, बेड ई. सर्वच केवळ 30 सेकंदात कोरोना आणि इतर व्हायरस मुक्त तसेच बॅक्टेरिया मुक्त केला जाऊ शकेल. ‘मेसर टेक्नोलॉजी’ द्वारा निर्मित, ‘अतूल्य मायक्रोवेव्ह’ हे जगातील पहिले हाती धरून वापरता येणारे उपकरण आहे. जे मायक्रोवेव्ह द्वारे तात्काळ निर्जंतुकीकरण करू शकेल. राष्ट्रीय संस्था DRDO द्वारा प्रमाणित तसेच फ्रांस व अमेरिकेच्या निकषांवर आधारित असे हे उपकरण 100 टक्के भारतीय बनावटीचे असून MSME अंतर्गत बनविले आहे. मुख्य म्हणजे ही यंत्रणा मानवासाठी अगदी सुरक्षित असून अल्ट्राव्हायोलेट किरणांसारखे याचे दुष्परिणाम नाहीत. तसेच ‘अतुल्य’ मध्ये पाणी अथवा रसायनांचा वापर नाही. त्यामुळे अतिशय सोयीस्कर व टिकावू आहे. या उपकरणा द्वारे 5 मीटर पर्यंतचा परिसर, पृष्ठभाग, वस्तू , इतकेच नव्हे तर खोके आणि डब्यांच्या आतील वस्तू देखील निर्जंतुक करता येऊ शकतात.
हे उपकरण बनवतांना खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी पुढाकार घेतला व सल्लागार म्हणून काम केले. मेसर टेक्नोलॉजीचे मोनिष भंडारी व त्यांच्या चमूने संशोधन करून हे उपकरण बनविले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे उपकरण आज लोकार्पण केले. त्यावेळी खा.डॉ.विकास महात्मे , शिवानी दाणी उपस्थित होते.

Post a Comment