शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 'मार्मिक'चा हीरकमहोत्सवशिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज 'मार्मिक'च्या हीरकमहोत्सवी वर्ष वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात संबोधित केले.
-
-
जगाचं मला माहिती नाही पण देशातलं मार्मिक हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक असेल ज्याने आपला हीरकमहोत्सव हा ऑनलाईन पद्धतीने साजरा केला. मी या निमित्ताने सर्व कलाकार, टेक्निशियन, ज्यांनी स्क्रिप्ट लिहिली त्या सर्वांना धन्यवाद देतो.
-
सध्या ऑनलाइनचे युग आहे. प्रिंट मीडियाचा उल्लेख करताना मार्मिक सुद्धा लवकरात लवकर डिजिटल रुपात ऑनलाईन आपल्या भेटीला येणार आहे हे आज मी जाहीर करतो.
-
सामर्थ्य हे शब्द, तलवार, बंदूक, तोफगोळे या सर्वात असतं पण शिवसेनाप्रमुखांनी जे सामर्थ्य दाखवलं ते कुंचल्यांच्या फटकाऱ्यातील सामर्थ्य दाखवलं. आपण जे चित्र डोळ्यासमोर आणतो ते कागदावर उतरवण्याचे माध्यम हे ते कुंचला करत असतो.
-
मराठी माणसावर अन्याय करण्याची कोणाची हिंमत नाही, पण आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर, भूमिपुत्रांवर अन्याय करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी गाठ शिवसेनेशी आहे, गाठ मार्मिकशी आहे, गाठ सामनाशी आहे.
-
मराठी माणूस कोणावर अन्याय करणार नाही पण जो आपल्यावर अन्याय करेल तो अन्याय करणारा आपण शिल्लक ठेवणार नाही. अन्यायाविरुद्ध वार करण्यासाठी, न्यायहक्कांसाठी, माता भगिनींच्या, गोरगरिबांच्या, दीन दुबळ्यांच्या रक्षणासाठी लढायचं.
-
मराठी माणसाने अत्याचार सोसला, भोगला आणि तरीदेखील अत्याचार करणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून छाताडावर भगवा झेंडा रोवला, ही आपल्या मराठी माणसाची ख्याती आहे, मराठी माणसाची ओळख आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post