'कोहिनूर'चे प्रदीप गांधी यांचे निधन
नगर : नगरच्या कापड बाजार येथील प्रसिद्ध कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक प्रदीप गांधी यांचे आज ह्दयविकाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते. ते 65 वर्षाचे होते. गांधी यांचे निधन नगरकरांसाठी मोठा धक्का देणारे आहे. कोहिनूरच्या माध्यमातून नगरचे नाव रोशन करताना त्यांनी नगर शहराच्या विकासातही योगदान दिले. नगरची बाजारपेठ फुलावी,शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा अशी त्यांची भूमिका होती.
Post a Comment