एकनाथ ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवकांचे लक्षवेध आंदोलन


एकनाथ ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवकांचे लक्षवेध आंदोलन

नगर -  महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मचाऱ्यांचे न्याय हक्क, प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी आज लक्षवेध आंदोलन करण्यात आले. याअंतर्गत  ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ  ढाकणे  यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यात अकोले येथे ग्रामसेवकांच्या निवडक प्रतिनिधींसह लक्षवेध  आंदोलन करण्यात येऊन त्याचे निवेदन  तहसीलदार,गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. एकनाथ ढाकणे म्हणाले की,  कर्मचाऱ्यांचे न्याय प्रश्न वेळेत न सोडविल्यास निश्चितपणे भविष्यात संघर्ष अटळ आहे. ग्रामसेवक कर्तव्य बजावत असताना त्यांना विविध सेवा सुविधा मिळत नाहीत.  राज्य सरकारी कर्मचारी चळवळीने 54 वर्षांत प्रचंड असे प्रश्‍न सोडवून कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे काम केलेला आहे. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये जाणीवपूर्वक सरकार कोरोना महामारीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची, ग्रामसेवकांची गळचेपी करत आहे. हे कदापि संघटना सहन करणार नाही असा  इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी अकोला तालुका ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष,सचिव, उपाध्यक्ष जिल्हा ग्रामसेवक युनियनचे उपाध्यक्ष, संघटक, अनेक सभासद ग्रामसेवक उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post