किरण काळे यांचा मोबाईल क्रमांक नगरकरांसाठी हेल्पलाईन

 किरण काळे यांचा मोबाईल क्रमांक नगरकरांसाठी हेल्पलाईन

नगर : कोरोना संदर्भातील अडीअडचणीत्याचबरोबर नगर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक ९०२८७२५३६८ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी स्वतः नगरकरांसाठी जाहीर केला आहे.
काँग्रेस पदाधिकारीकार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ना.थोरात यांच्या हस्ते काळे यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक नगर शहरातील नागरिकांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हेल्पलाईन म्हणून जाहीर करण्यात आला. यावेळी आ. डॉ.सुधीर तांबेआ.लहू कानडेजिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखेजिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारेमाजी महापौर दीप चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. थोरात म्हणाले कीसध्या नगर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. प्रशासन यासाठी अहोरात्र काम करत आहे. नागरिकांना या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची आवश्यकता भासल्यास अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आमचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे २४ तास नगरकरांसाठी उपलब्ध आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post