के.के.रेंजप्रश्नी खा.विखेंनी घेतली लष्करप्रमुखांची भेट


के.के.रेंजप्रश्नी खा.विखेंनी घेतली लष्करप्रमुखांची भेट

नवी दिल्ली: आज खासदार_डॉ_सुजय_विखे_पाटील यांनी राष्ट्रीय सेना भवन येथे भारतीय लष्करप्रमुख नरवणे साहेब यांची भेट घेतली. भेटीदरम्यान के.के. रेंजविषयी असलेल्या शंका, प्रश्न व समस्यांविषयी प्रदीर्घ व सविस्तर चर्चा केली. तसेच यावेळी के.के.रेंज प्रश्नावर कशाप्रकारे तोडगा काढण्यात येईल याबाबतीत देखील चर्चा झाली असून, तोपर्यंत लष्कराचे सराव, कार्यवाही थांबविण्याची विनंती खा.विखे यांनी लष्कर प्रमुखांकडे केली.
राष्ट्रीय सेना भवन येथे भारतीय लष्करप्रमुख माननीय श्री. नरवणे साहेब यांची भेट घेतली. भेटीदरम्यान के.के. रेंजविषयी असलेल्या शंका, प्रश्न व समस्यांविषयी प्रदीर्घ व सविस्तर चर्चा केली. तसेच यावेळी के.के.रेंज प्रश्नावर कशाप्रकारे तोडगा काढण्यात येईल याबाबतीत देखील चर्चा झाली असून, तोपर्यंत लष्कराचे सराव, कार्यवाही थांबविण्याची विनंती श्री. नरवणे साहेबांना केली.

 लष्करप्रमुखांशी झालेल्या या सविस्तर चर्चेविषयी  येत्या १५ दिवसात त्या त्या तालुक्यातील प्रतिनिधींच्या सहकार्याने नागरिकांना गावदौराद्वारे माहिती देणार आहे. जेणेकरून केलेल्या पाठपुराव्याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण राहणार नाही,असे खा.विखे यांनी कळवले आहे.

दरम्यान याच प्रश्नावर खा.विखे यांनी काल संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post