पर्युषण पर्व काळात नगरमधील कत्तलखाने बंद ठेवावेत

पर्युषण पर्व काळात नगरमधील कत्तलखाने बंद ठेवावेत
श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाची मागण
अहमदनगर: संपूर्ण देशभरात जैन समाजाचा पवित्र चातुर्मास सध्या सुरु आहे.  याच काळात दि.15 ते 24 ऑगस्ट दरम्यान पर्युषण पर्व आहे. याकाळात मोठ्या प्रमाणात धार्मिक आराधना, तप, जाप, पूजाअर्चा होते.भगवान महावीर स्वामी यांच्या उपदेशानुसार अहिंसा, जीवदया जैन संस्कृतीचा आत्मा आहे.  जिओ और जिनो दो हे जैनांचे ब्रीदवाक्य आहे.  यागोष्टी लक्षात घेता प्रशासनाने पर्युषण काळात दि.15 ते 24 ऑगस्ट दरम्यान नगर शहर व जिल्ह्यातील  सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करावेत अशी मागणी श्री  श्वेतांबर संघ कापडबाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाषलाल मुथा यांनी केली आहे.  याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की , सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अखिल भारतीय पशुकल्याण बोर्ड, भारत सरकारने दि.6 ऑगस्ट 2020 रोजी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश यांना जैन धर्माचे पर्युषण काळात सर्व अधिकृत,  अवैध कत्तलखाने,  मांस विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नगर शहर व जिल्ह्यातील  कत्तलखानेही पर्युषण महापर्व काळात बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मुथा यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post