खासगी डॉक्टरांबाबत गैरसमज पसरवणे थांबवा, जीव धोक्यात घालून ते सेवा देतायत

अहमदनगरचे करोना योद्धे । जीव धोक्यात घालून IMA डॉक्टरांची सेवा


*अहदनगर* - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात काम करणे धोक्याचे आहे. असे असतानाही खासगी वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स आपला व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्राणात वाढत आहे. यासाठी आवश्यक असलेली काळजी घेतली जात नसल्याने तसेच प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याने हा प्रादुर्भाव वाढत आहे.पेशंट अत्यवस्थ व मृत्यु होण्यामागे आजाराकडे दुर्लक्ष व उशीरा हॉस्पिटलमध्ये दाखल होणे हे एक मुख्य कारण आहे. नगरधील मार्चधील रुग्ण संख्या आणि सध्याची रुग्ण संख्या यात मोठी तफावत आहे. निष्काळजीपणामुळे ही संख्या वाढत चालली आहे. त्याबाबत विचार करून काळजी घेण्याऐवजी रुग्णांवर आपला जीव धोक्यात घालून उपचार करणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकांवर आगपाखड करण्यात येत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सुरुवातीच्या काळात सिव्हील, बुथ आणि एम्स या हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले. त्या काळात सिव्हील आणि बुथमध्ये ‘IMA’चे मेडिसीन एमडी, भूलतज्ज्ञ यांनी आयसीयूमध्ये सेवा दिली. जशीजशी रुग्ण संख्या वाढू लागली, तशी या रुग्णालयांतील बेडची संख्या कमी पडू लागली. त्यामुळे नोबेल, स्वास्थ्य, साईदीप यांनी खासगी कोविड रुग्णालय सुरू केले. त्या पाठोपाठ मककेअर, श्रीदीप, साई एशियन यांनी पतियाळा हाऊसध्ये कोविड उपचार केंद्र सुरू केले.
या काळात कोविड व्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार रखडू नयेत, याचीही काळजी घेण्यात आली. विशेषत: गरोदर स्त्रियांवरील उपचार आणि प्रसूती यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. सिव्हील हॉस्पीटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल होणार्‍यांवर विखे पाटील हॉस्पीटलमध्ये उपचार आणि प्रसुती ima च्या स्त्री रोग तज्ज्ञांच्या मदतीने करण्यात आल्या, करण्यात आल्या. लहान मुलांनाही त्यांच्या आजारावरील उपचार मिळावेत यासाठी बालाजी आणि सिद्धी विनायक येथे तपासणी करण्यात आली. जसा जसा काळ पुढे सरकत गेला, तसे रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे एक, दोन नव्हे तर तब्बल सोळा रुग्णालयांध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले. यात आयुर्वेद आणि होमीओपॅथिक डॉक्टरांनीही खांद्याला खांदा लावून सेवा दिली. या सर्व गोष्टींसाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी मोलाचे सहकार्य केले.
ही सेवा दिली जात असताना ‘आयएमए’चे तीसहून अधिक डॉक्टर व त्यांचे कुटुंबीय कोविड पॉझिटीव्ह झाले. ,यामध्ये मेडिसिन चे 6, बालरोगतज्ज्ञ 4, भूल तज्ज्ञ 4, कान नाक तज्ज्ञ 2, स्त्रीरोग तज्ञ 4, डॉक्टर पॉझिटिव्ह आले .शहरातील खाजगी कान नाक तज्ज्ञांनी करोना चाचणी कामी लागणाऱ्या घश्यातील स्त्राव घेण्यास प्रशासनाला मोलाची मदत केली,त्यात त्यांचे 2 डॉक्टर बाधित झाले. कर्जत येथील डॉ. विलास काकडे यांना आपला जीव गमवावा रुग्ण सेवा करताना गमवावा लागला. तसेच निमा संघटनेचे डॉ जगताप व डॉ गाजवे यानाही आपला प्राण गमवावा लागला. खाजगी डॉक्टर आपले स्वतःचे हॉस्पिटलमध्ये करोना पेशंट बघून सिविल, बूथ येथे प्रशासन ला मदत म्हणून विनामूल्य पेशंट गेल्या 5 महिन्यापासून बघत आहेत.आता पर्यंत खाजगी covid हॉस्पिटल मधून जवळपास 1700 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत व मृत्य फक्त 70 झाले असून हे प्रमाण अत्यंत कमी आहे, असे असतानाही खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर जास्त बील घेण्यात येत असल्याचे व खाजगी रुग्णालयात मृत्यू दर जास्त असल्याचे आरोप केले जात आहेत. करोना हा सर्व जगासाठी नवीन आजार असून त्यासाठी अजून पर्यंत औषध सापडले नसून त्यामुळे डॉक्टर ना देखील यामुळे उपचारासाठी मर्यादा आल्या आहे,तरी देखील डॉक्टर पूर्ण प्रयत्न करून देखील रुग्ण दगवल्यास त्याचा दोष डॉक्टरा ना दिला जातो यामुळे डॉक्टरांचे नक्कीच मानसिक खच्चीकरण होते.जास्त बील येण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. सर्वच रुग्णालये सरकारने ठरवून दिलेल्या दरातच उपचार करते परंतु एखादा रुग्ण गंभीर झाल्यास त्याला करोना वरील इंजेक्शन द्यावे लागले तर मात्र पेशंट चे बिल वाढते ही सत्य परिस्थिती जाणून न घेता संबंधित रुग्णालय जास्त बिल घेते अशी ओरड काही वर्गाकडून केली जाते .या गोष्टींचा विचार हा आरोप करताना केला जात नसल्याची खंत ‘IMA’ने व्यक्त केली आहे.तसेच मीडिया ने पण जी या करोना युद्धात महत्वाची भूमिका बजावत आहे त्यांनी देखील ह्या गोष्टी मग ते मृत्युदर असो , बिलाचा विषय असो  या संबंधी सत्यता समाजा  पुढे मांडून त्याबद्दलचा गैरसमज दूर करण्यास मदत करावी.
डॉ अनिल आठरे       
अध्यक्ष, IMA
डॉ सचिन वहाडणे
सचिव ,IMA

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post