आज वाढले ४० नवे रुग्ण

*दिनांक: १७ ऑगस्ट, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल*

*आज  ५३९ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज तर वाढले ४० नवे रुग्ण*

अहमदनगर: जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०६२० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ८०.३१ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २४८० इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५,  पाथर्डी ०२,  नगर ग्रा. १३, नेवासा ०२, पारनेर ०५ आणि शेवगाव ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ५३९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा २७७, संगमनेर ३५, राहाता १७, पाथर्डी ३१, नगर ग्रा.४९, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट ०६, नेवासा ०२, श्रीगोंदा १४, पारनेर १६, अकोले ०३, राहुरी १३, शेवगाव ०२, कोपरगाव १०, जामखेड १७, कर्जत २४, मिलिटरी हॉस्पिटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 *बरे झालेली रुग्ण संख्या: १०६२०*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:२४८०*

*मृत्यू :१६३*

*एकूण रूग्ण संख्या:१३२६३*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

*STAY HOME STAY SAFE*

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*

*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post