नगरमध्ये मानाच्या गणपती मंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

*नगरमध्ये मानाच्या गणपती मंडळाचा महत्वपूर्ण निर्णय * 
विना मंडप साधेपणाने साजरा होणार उत्सव

नगर शहरात करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.  माळीवाडा भागातील मानाच्या गणपती मंडळांनी प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत यंदा मंडप न टाकता उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
 नगर शहरातील ग्राम दैवत .विशाल गणपती मंदिर, माळीवाडा  येथील बैठकीत एकमताने निर्णय झाला.
दिनांक १० ऑगस्ट रोजी कोतवाली पोलिस स्टेशन येथे झालेल्या बैठकीत अहमदनगर शहरातील गणेश उत्सव साधे पणाने व विना मंडप साजरे करण्याबाबत पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आवाहन केले होते.
त्या अनुषंगाने आज नगर शहरातील ग्राम दैवत .विशाल गणपती मंदिर, माळीवाडा  अहमदनगर येथे येथे गणेश मंडळ अध्यक्ष अभय आगरकर, ऋषिकेश कावरे, निलेश खरपुडे, गणेश हूच्चे ,सुनील जाधव, अनिल हुमने, मनीष साठे,रवींद्र जपे, स्वप्नील घुले,शिवाजी कदम, बाळासाहेब बोराटे, विशाल भागानगरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील मानाचे मंडळाचे  उत्सव साधे पणाने, विना मंडप व कोरोना संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने प्रशासनाने दिलेल्या सर्व आदेशा प्रमाणे करण्याचे एक मताने निर्णय घेण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post