जिल्ह्यात ३५९ रुग्णांची भर

*दिनांक: १० ऑगस्ट, रात्री ७-३० वाजता*


*आज ३९७ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज तर नव्या ३५९ रुग्णांची भर*

*अहमदनगर*: जिल्ह्यात आज ३९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६६४७ झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६५.९३ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३५९  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३२३  इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४१, अँटीजेन चाचणीत १६५ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये  मनपा २१,, नगर ग्रामीण ०७, कँटोन्मेंट ०४, पारनेर ०५, जामखेड ०१ आणि मिलिटरी हॉस्पीटल ०३अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १६५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०१, संगमनेर २६,  राहाता १५, पाथर्डी २९, नगर ग्रामीण १३, श्रीरामपुर १०, श्रीगोंदा १४, पारनेर ०५, अकोले ०३, राहुरी ०९, कोपरगाव ०८, जामखेड १० आणि कर्जत २२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १५३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ११२, संगमनेर ०३, पाथर्डी ०६, नगर ग्रामीण ०८, श्रीरामपूर ०८, नेवासा ०३, श्रीगोंदा ०२, पारनेर ०१, राहुरी ०१ आणि कर्जत ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ३९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १९५, संगमनेर २९ राहाता ४, पाथर्डी  ४, नगर ग्रा.११ श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट ३, नेवासा ११, श्रीगोंदा २०, पारनेर ३६, अकोले १४, शेवगाव २९, कोपरगाव २६, जामखेड ६, कर्जत ०६, मिलिटरी हॉस्पीटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेले एकूण रुग्ण:६६४७*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:३३२३*

*मृत्यू: ११२*

*एकूण रूग्ण संख्या:१००८२*

*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

*STAY HOME STAY SAFE*

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*

*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post