वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीचाही समान वाटा, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीचाही समान वाटा, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
नवी दिल्ली :  वडिलांच्या संपत्तीच मुलाप्रमाणे मुलीलाही वाटा मिळावा या मुद्द्यावर बराच वाद सुरू होता.  आता अखेर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आपला ऐतिहासिक निर्णय देत मोहोर उमटवली आहे. यापुढे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान वाटा मिळेल, असं कोर्टाने स्पष्ट केले आहे.
आपल्या पित्याच्या  मालमत्तेत हिंदू स्त्रियांना भावा प्रमाणे समान वाटा मिळेल, असे  2005 मध्ये अधिनियमित केले गेले होते. त्यानुसार, मुलगा व मुलगी दोघांनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क मिळतील. परंतु, हा कायदा  2005 पूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असेल त्यांना याचा लाभ मिळेल की नाही हे स्पष्ट नव्हते.
आज न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल असा निर्णय ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
मुलीला 1956 च्या कायद्यानुसार हिस्सा मिळणार होता. पण  2005 सालात केंद्र सरकारने यात बदल केला. मात्र, त्यात 2005 सालानंतर ज्या मुली जन्मतील त्या मुलींना समान हिस्सा मिळणार असा बदल करण्यात आला.  आता हा मुद्दा कायमचा वगळण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post