अन्यायाविरोधात लढायला व नडायला शिकवणारे "भैय्या"

अन्यायाविरोधात लढायला व नडायला शिकवणारे "भैय्या"


1994- 95 चा काळ असेल, मी माझ्या कामानिमित्ताने मार्केटमध्ये कोठी रस्त्यावर बसलेलो होतो. माझा राजकारणाशी त्यावेळी दूर दूर संबं नव्हता. एका गाळेधारकाचे व त्यासमोर असलेल्या एका चहावाल्या ताईचे भांडण सुरू होते. आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. बराच काळ गेला. थोड्या वेळाने एक चांगला तब्येतीचा माणूस आला व त्या गाळे धारकाला म्हणाला, "तू अगोदर की ही ताई", तो म्हणाला, "ही ताई" "मग तू तिला का हाकलतो,,तू तिची सोय होईपर्यंत काही म्हणू नको नाही, तर माझ्याशी गाठ आहे",
गाळेधारक एकदम शांत झाला व हो म्हणाला . 

इथे ती गोष्ट संपली पण भैय्या येथे कसे आले? त्यांना कोणी सांगितले?  त्या ताईंचा इयत्ता चौथी मधील मुलगा व त्याचा मित्र दोघे सायकलवर चितळे रोडवर त्यांच्याकडे गेले व माझ्या आई बरोबर एक जण भांडत आहे असे सांगितले. मग ते मुले पुढे व भैय्यांची स्कुटर मागे असे पोहचले. 
वास्तविक त्या ताईचे गाव आष्टी. ती त्यांची मतदार नाही.परंतु तो गाळेधारक मात्र मतदार.  त्यांच्या जागी मी असतो तरीही त्या ताईची बाजू घेतली नसती. कारण ती मतदार नव्हती...

असे गरीबांचे कैवारी असलेले अनिलभैय्या मी पहिल्यांदा पाहिले व त्यांचा मनातून आशीक झालो. नंतर शे दोनशे जण त्यांची तारीफ करत तासभर चर्चा करत होते. तेही आदराने, नाही तर आज लोक तोंडावर आदराने व चांगले बोलतात आणि ते नेते पुढे गेल्यावर मात्र ****** फुल्या फुल्या अगदी शिव्याशाप देतात. ते त्यांच्या बाबतीत नव्हतेच.

  2006 च्या दरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता मी शिवसेनेकडून उमेदवारी केली. तेव्हाही भैय्यांनी तालुक्यातील जनतेचं मत विचारात घेऊन आदरणीय मा.खासदार कै. दादा पाटील शेळके उर्फ अण्णा यांच्याशी युती करण्याची लोकांच्या मनातील भावना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांतजी गाडे सर यांच्या सहकार्याने अस्तित्वात आणली. यातुनच पंचायत समितीवर प्रथम भगवा फडकवला. मी त्या वेळी राजकारणाचा काहीही अनुभव नसतांना जिल्हा परिषद सदस्य झालो. त्या काळात त्यांनी तालुक्यात केलेला झंझावाती प्रचार, त्यांनी केलेल्या परखड मतांची मांडणी ,तालुक्यातील जनतेने त्यांना दिलेल्या प्रतिसादाचा मी व अनेक जण साक्षीदार आहेत.

  एकदा जिल्हा परिषदे मध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकर संदर्भात आम्ही उपोषणाला बसलो. सकाळ ते संध्याकाळ असा काळ गेला,आमची मागणी मान्य झाली नाही. शेवटी भैय्या संध्याकाळी जिल्हा परिषद मध्ये आले. सर्वात पहिल्यांदा त्यांनी मला झापले म्हणाले, "कार्ले शिवसेनेत उपोषण चालत नाही. शिवसेना स्टाइलने काम करायचे नाही तर परत मला सांगू नको" त्यांचा आवाज ऐकताच अधिकारी धावत येऊन आमच्या योग्य  मागण्या त्वरित मान्य केल्या. आणि खऱ्या अर्थाने मला चार्ज केले व आक्रमक काम कसे करायचे ते शिकवले.
 ते आल्यानंतर  प्रचंड आवेशात दिल्या जाणार्या  घोषणा,अरे हा बुलंद आवाज कुणाचा,,,,,, बस त्यातच काम व्हायचं. 

 शिवजयंतीच्या निमित्ताने शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांच्यासह सुरतचा चार पाच दिवसांचा अखंड सहवास व त्यातील अगदी साधेपणा त्यांच्याशी कौटूंबिक  जवळीक  निर्माण करणारा होता., कांद्याच्या आंदोलनात मला मारहाण झाल्यावर त्यांनी अगदी आक्रमकपणे बाजू घेऊन दिलेली साथ डोळ्यांपुढुनं जात नाही., ते आमदार होते तेव्हाही, आणि नव्हते तेव्हाही त्यांचा तेवढाच मोठा आधार मलाच नाही तर आम्हा सर्व सहकाऱ्यांना होता. अगदी आत्ता कोरोना सुरू झाल्यावर तालुक्यात आम्ही काही मदत करू काय ? असे ते विचारायचे. फोनवरच नाही तर बोलावून घेऊनही मार्गदर्शन कारायचे.

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भैय्यांनी आम्हाला लढायचे व नडायचे  शिकवले. त्याचे धडे दिले. एकीकडे शांत संयमी जिल्हाप्रमुख गाडे सर,दुसरीकडे आक्रमक उपनेते माजी मंत्री भैय्या असे दोन आधार. आत्ता त्यातला एक आक्रमक व कशाचीही पर्वा न करणारा  आमच्यासह सर्व सामान्यांचे भैय्या कायमचाच आपणा सर्वांना सोडून गेले.

  म्हणूनच त्या दिवशी भैय्याना अंतिम निरोप देतांना माझ्यासह सर्वांनी दिलेल्या *कोण आला रे कोण आला ,शिवसेनेचा वाघ आला* या घोषणा अगदी डोळ्यात अश्रु असतानाही देत होतो. त्यांना निरोप देतांना वाटेतील सर्वसामान्यांची प्रतिक्रिया अगदीच आपुलकीच्या होत्या. सर्वसामान्यांचा भैय्या खऱ्या अर्थाने गेल्याची जाणीव आता हळूहळू होत आहे ,,
   परंतु भैय्या तुम्हाला खरी श्रद्धांजली म्हणजे सर्वसामान्यांसाठी आक्रमकता व उपलब्धता कायम ठेऊ ,,,,,,,
*घेतल्याशिवाय राहणार नाही* ,,
आता नाही रडणार ,तुमच्या आठवणीत लढणार...

जय हिंद जय महाराष्ट्र 
         आपला
       *संदेश तुकाराम कार्ले* 
शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य, नगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post