करोना संकटात अडीअडचणीबाबत मोबाईलवर थेट संपर्क साधा

करोना संकटात अडीअडचणीबाबत मोबाईलवर थेट संपर्क साधा 
आ.संग्राम जगताप यांचे आवाहन, मो. 9090702222

-------
नगर :  नागरिकांनी या कोरोना संकटाच्या काळात योग्य माहिती व मदतीसाठी माझ्याशी 9090702222 या मोबाईलवर विनासंकोच संपर्क करावा, असे आवाहन आ.संग्राम जगताप यांनी केले आहे.
शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने रुग्णालयातील बेड कमी पडू लागले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल होताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बेड मिळण्यासाठी अनेक रुग्णालयांकडे चकरा माराव्या लागत आहेत. याशिवाय शहरात कुठे कोविड केअर सेंटर आहे व कोठे इतर आजारांवरील उपचार सुविधा सुरू आहे, याची माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी या कोरोना संकटाच्या काळात योग्य माहिती व मार्गदर्शन मिळावे, यासाठी त्यांनी मला विनासंकोच संपर्क करावा, असे आवाहन आ.जगताप यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post