....तर भरावे लागेल अतिरिक्त शुल्क

स्टेट बँकेच्या खातेदारांसाठी एटीएम वापराचे नवीन नियम
....तर भरावे लागेल अतिरिक्त शुल्क

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ 
इंडियाने  आपल्या एटीएम वापराचे नवीन नियम जाहीर केलेत.  मेट्रो शहरातील नियमित बचत खातेधारकांना एटीएममधून महिन्याला आठ वेळा ट्रॅन्झॅक्शन करण्याची सुविधा दिली आहे. मोफत ट्रॅन्झॅक्शन करण्याची मर्यादा संपल्यावर त्यापुढील ट्रॅन्झॅक्शनवर ग्राहकांकडून पैसे वसूल केले जातील, अशी माहिती एसबीआयने आपल्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर दिली आहे. त्यासोबत खात्यात पैसे नसतानाही तुम्ही ट्रॅन्झॅक्शन केले आणि ते फेल झाले तर तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे.
 मेट्रो शहरा व्यतिरीक्त इतर ठिकाणी 10 ट्रॅन्झॅक्शन मोफत दिले आहेत. यामध्ये पाच ट्रॅन्झॅक्शन एसबीआय बँकेसाठी तर इतर पाच दुसऱ्या बँकांसाठी दिले आहेत.
बँकेच्या बचत खात्यामध्ये एक लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे महिन्याला ठेवत असतील, अशा खातेधारकांना स्टेट बँक ग्रुप (SBG) आणि इतर बँकाचे एटीएमच्या ट्रॅन्झॅक्शनसाठी अमर्यादीत ट्रॅन्झॅक्शनची सुविधा दिली जाते.

जर एखाद्या खातेधारकाच्या खात्यात पैसे नसतील आणि अशावेळी कोणतेही ट्रॅन्झॅक्शन जर फेल झाले, तर त्या खातेधारकावर एसबीआय 20 रुपयांचे शुल्क अधिक जीएसटी वसूल करेल. म्हणजेच एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण खात्यात पैसे नसल्याने ट्रॅन्झॅक्शन फेल झाले तर शुल्क भरावे लागणार.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post