मी पाहिले वडिलांच्या प्रेमापुुढे करोनाला हरताना...

मी पाहिले वडिलांच्या प्रेमापुुढे करोनाला हरताना...


मन सुन्न करणारी गोष्ट आहे (CRHP आरोळे हॉस्पिटल) जामखेड़ची...

.8 ऑगस्ट 2020 रोजी एक 5 वर्षाची मुलगी करोना पॉजिटिव आली  व मुलीची आजी पॉजिटिव आली. मुलीला व आजीला हॉस्पिटलमध्ये एडमिट केले. नंतर आजीचे बाकीचे प्रॉब्लम असल्यामुळे त्यांना नगरला पाठावन्यात आले. ती मुलगी हॉस्पिटल मध्ये एकटी राहयला तयार नव्हती. वड़ीलाने सर्व आधिकार्याना लक्षात आणून दिले कि, 5 वर्षाची मुलगी एकटी कशी राहील, सर्व आधीकारी व डॉक्टर तयार झाले की, मुलीला तुम्ही रानात ठेवताल  तर आम्ही घरी सोडतो. वड़ीलाने आपल्या मुलीला घरी नेले, पण समाज थोडा विचित्र आहे. आणि आज जी करोनाची भीती आहे ते पण एक कारण आहे. गावातील लोकांनी डॉक्टराना फोन वर फोन ( डॉक्टर व अधिकारी त्यांच्या जागी बरोबर आहेत. कारण ते नियमाच्या आधिन आहेत) करुन त्या मुलीला शेवटी हॉस्पिटल मध्ये येण्यास भाग पाडले. मी सकाळी नेहमी प्रमाणे 9 वाजता ड्यूटीवर गेलो तर ती मुलगी दरवाज़ात ऊभी होती. मी विचारले की तुम्ही येथे कसे, तर वडीलानी सर्व सांगितले. मी विचारले आता ती एकटी कशी रहीन ? तर वडिलांचे वाक्य मनाला लागुन राहिले, 'कारोना मुली पेक्षा मोठा आहे का? जे होइन होऊ दया,मीपण राहातो मुलीसोबत पॉजिटिव वार्डमध्ये'  मन सुन्न झाले ..मी आमच्या डायरेक्टर साहेबाना (रविदादा आरोळे) फोन केला व सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनी काही विचार न करता गेस्ट हाऊस मध्ये एक AC ROOM दे, असे म्हणाले. आज ती मुलगी आपल्या वड़ीलांसोबत त्या रूम मध्ये आहे.
आज मी कारोनाला हरताना पाहिले एका वडिलांच्या प्रेमा पुढे....
 - आसिफ पठाण (जामखेड )
साभार- फेसबुक 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post