50 टक्के एसटी बस सेवा पुर्ववत सुरु करावी

भारिप व वंचित बहुजन आघाडीचे डफ वाजवून आंदोलन
नागरिकांच्या सोयीसाठी 50 टक्के एसटी बस सेवा पुर्ववत सुरु करण्याची मागणी

अहमदनगर(प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाची सार्वजनिक एसटी बस सेवा 50 टक्के सुरु करण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परिवहन महामंडळाच्या सर्जेपुरा येथील विभागीय कार्यालया समोर डफ वाजवून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात युवक जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदिवे, जिल्हा महासचिव सुनील शिंदे, सुनिल गट्टाणी, दिलीप साळवे, विनोद गायकवाड, संदीप गायकवाड आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह महाराष्ट्रात उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. टाळेबंदी काळात प्रशासनाच्या वतीने एसटीची वाहतुक सेवा बंद करण्यात आली होती. सध्या राज्य सरकारने अनलॉकची मोहिम हाती घेतली असून, अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, मॉल आदींना परवानगी देण्यात आली आहे. नागरिक कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी नियमांचे पालन करुन आपले दैनंदिन व्यवहार करीत आहे. सध्या आंतरजिल्हा वाहतुक बंदी असली तरी परवानगी घेऊन खाजगी वाहनातून वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. खाजगी वाहनातून प्रवास करणे सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. खाजगी वाहतुक सुविधा अपुरी, असुरक्षित व खर्चिक असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मानसिक व आर्थिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिवहन महामंडळाची एसटी बस सेवा सुरु झाल्यास नागरिकांना परवानगी घेऊन दळणवळण करण्यास शक्य होणार आहे. तरी परिवहन महामंडळाने तातडीने निर्णय घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी 50 टक्के एसटी बस सेवा पुर्ववत सुरु करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.    Sajid shaikh

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post