बलात्कारातील आरोपी १२ तासात जेरबंद

 बलात्कारातील आरोपी १२ तासात जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखा, घारगाव पोलीस तसेच  सायबर सेल यांची संयुक्त कामगिरी

नगर : दि.7 ऑगस्ट रोजी सायं. 5.45 वा.सुमारास संगमनेर बायपास पुणे - नाशिक हायवेवर चाकण येथे जाण्यासाटी
एक प्रवाशी महीला एका पिकअप मध्ये बसवू जात असताना रात्री 9 ते 12 दरम्यान नारायणगाव ता.जुन्नर जि. पुणे
परिसरात पिकअप चालकाने  प्रवाशी महीलेशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन बळजबरीने दारु पाजुन
बलात्कार केला व तिला आळेफाटा ता.जुन्नर जि.पुणे येथे सोडुन दिले. सदर घटनेबाबत प्रवाशी पिडीत महीलेच्या फिर्यादीवरुन
दि.१४ ऑगस्ट रोजी घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा
 दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हाचे गांभीर्य लक्ष्यात घेवुन गुन्हयाचे घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक दीपाली काळे , पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, रोशन पंडीत, पो.नि.दिलीप पवार,पो.नि.अंबादास भुसारे, पोसई गणेश इंगळे
यांनी घटनास्थळी भेट देवुन गुन्हयातील फिर्यादी यांचेकडे घडलेल्या घटनेबाबत सखोल चौकशी करुन आरोपीचे वर्णन, व गुन्हयात वापरलेले पिकअप बाबत माहीती घेतली. सदर दाखल गुन्हयाचा तपास गुप्त बातमीदारामार्फत व तांत्रिक पदधतीने केला असता तांत्रिक विश्लेषणावरुन सदरचा गुन्हा हा आरोपी सुखदेव बबन कंकराळे (वय-३९ रा.मस्जीद जवळ कोर्ट परीसर बारगाव पिंपरी रोड ,सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक) यांने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने  स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर पथकातील पोसई/गणेश इंगळे ,सफौ गाजरे ,पोहेकॉ/ विजयकुमार बेठेकर ,पोना/ विशाल
दळवी,  पोना. ज्ञानेश्वर शिंदे ,पोना/रवि सोनटक्के,पोका/बडे, चालक पोहेकॉ/ भोपळे ,चापोना/बुधवंत तसेच घारगाव पोलीस स्टेशनचे पो.नि. अंबादास भुसारे,पोन/संतोष खैरे,पोकॉ/किशोर लाड, विशाल कर्पे , तसेच सायबर
सेलमधील फरकन शेख ,आकाश गहीरट अशांनी सदर आरापी यांस नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणे येथुन ताब्यात घेतले.
 बारकाईने चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्यानेच केला असल्याचे कबुल केल्याने त्यास पुढील तपासकामी घारगाव पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास घारगाव पो.स्टे.करीत आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post