पंतप्रधान नरेंद्र जी मोदी सामान्य नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून योजना राबवतात : अजय चितळेपंतप्रधान नरेंद्र जी मोदी सामान्य नागरिकांचे 
हित डोळ्यासमोर ठेवून योजना राबवतात : अजय चितळे

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा भारतीय जनता पार्टी मध्य नगर शहर मंडलाच्या वतीने सुरू करण्यात आल्याची माहिती मंडल अध्यक्ष अजय चितळे यांनी दिली. कोरोणा महामारी च्या लॉकडाउनच्या काळामध्ये हातावरची पोटे असणाऱ्या नागरिकांचे उद्योगधंदे ठप्प झालेले होते. धंदा पुन्हा उभारणी करण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी पंतप्रधान स्व निधी ही योजना राबविलेली आहे. सदर योजनेमध्ये दहा हजार रुपये कर्ज स्वरूपाने बँकांच्या माध्यमातून भाडवल उपलब्ध व्हावे या हेतूने केंद्र सरकारने पंतप्रधान स्व निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेमध्ये फॉर्म भरण्यासाठी ज्या बँकेत आपले खाते आहे त्या बँकेचे पासबुक, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड व दोन फोटो असे कागदपत्र लागतात. धंदेवाईक माणसांना होणारी धावपळ थांबावी म्हणून त्या लोकांमध्ये जाऊन जागेवर त्यांना सुविधा देण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या मध्य नगर शहर मंडला च्या वतीने सुरू करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींनी फॉर्म भरलेले आहेत व त्यांना अजून योजनेचा फायदा मिळालेला नाही अशा लोकांनी महानगरपालिकेचे निलेश शिंदे मो.न,(918788628493, 9730738557), यांच्याकडे आपले नाव नोंदवावे व कोणत्या बँकेत आपले खाते आहे याबाबत माहिती द्यावी त्याचा पाठपुरावा महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे श्री निलेश शिंदे यांनी सांगितले. ज्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी दुपारी 1 ते 3 या वेळेत गाडगीळ पटांगण भाजी मार्केट येथे फॉर्म भरण्यासाठी यावे असे आवाहन मध्य नगर शहर मंडल अध्यक्ष अजय चितळे यांनी यावेळी केले. यावेळी नगरसेविका सोनाली चितळे, उपायुक्त सिनारे साहेब, एन एल यु एम विभागाचे निलेश शिंदे, नानासाहेब बेलेकर सुप्रिया घोगरे, मनोज भुजबळ, दीपक गांधी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post