आज नव्या ६८ रुग्णांची भर

आज ४७८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज तर नव्या ६८ रुग्णांची भर


अहमदनगर: जिल्ह्यात आज ४७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७७४१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७२.३९ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६८  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २८३५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६८ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये  मनपा २६, पाथर्डी ०४,  नगर ग्रामीण १४, श्रीरामपुर ०१, कँटोन्मेंट ०७, नेवासा १२,  पारनेर ०१, शेवगाव ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ४७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १८५, संगमनेर २२, राहाता १४, पाथर्डी ३०, नगर ग्रा.२६, श्रीरामपूर ३७ , कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २२,   श्रीगोंदा १५, पारनेर १८, अकोले ०६, राहुरी ०४,
शेवगाव २५, कोपरगाव ३७, जामखेड ०३, कर्जत १७ आणि मिलिटरी हॉस्पीटल ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेले एकूण रुग्ण:७७४१

उपचार सुरू असलेले रूग्ण:२८३५

मृत्यू: ११८

एकूण रूग्ण संख्या:१०६९४

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

STAY HOME STAY SAFE

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post