६१६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज तर नव्या ४१ रुग्णांची भर

जिल्ह्यातील सात हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन परतले घरी

आज ६१६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज तर नव्या ४१ रुग्णांची भर


अहमदनगर: जिल्ह्यात आज ६१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७३६३ झाली आहे.. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७१.७५ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४१  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २७४८  इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४१ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये  मनपा१६,, नगर ग्रामीण ०८, कँटोन्मेंट ०२, पारनेर ०९, अकोले ०५ आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ६१६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा ३००, संगमनेर २०, राहाता ६, पाथर्डी २४, नगर ग्रा.१८, श्रीरामपूर २६ , कॅन्टोन्मेंट २१, नेवासा १७,  राहुरी १९, श्रीगोंदा ३७, पारनेर ३८, अकोले २, शेवगाव ३३, कोपरगाव २०, जामखेड ७, कर्जत २७ आणि मिलिटरी हॉस्पीटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेले एकूण रुग्ण:७२६३

उपचार सुरू असलेले रूग्ण:२७४८

मृत्यू: ११२

एकूण रूग्ण संख्या:१०१२३

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

STAY HOME STAY SAFE

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post