आज नव्या २०७ बाधितांची रुग्णसंख्येत भर

दिनांक: ३१ ऑगस्ट, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल

आज तब्बल ७०० रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ८७६ रुग्ण बरे होऊन परतले घरी

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.०९ टक्के

आज नव्या २०७ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ७०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ८७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३०९१ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११२, संगमनेर ०४, राहाता ०२, पाथर्डी १८, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर ०१, नेवासा ०१, पारनेर ०१, अकोले २१, राहुरी १७, कोपरगाव ०३, जामखेड १२, कर्जत ०३ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ७०० रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २९७, संगमनेर ३३, राहाता २९, पाथर्डी २४, नगर ग्रा.५०, श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट २०, नेवासा १४, श्रीगोंदा ३२, पारनेर १६, अकोले ३२, राहुरी ११, शेवगाव ०५,  कोपरगाव ४९, जामखेड ५१, कर्जत ०४ आणि मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: १७८७६*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:३०९१*

*मृत्यू: २९०*

*एकूण रूग्ण संख्या:२१२५७*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

STAY HOME STAY SAFE

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post